Friday, March 29, 2013

आमची तन्वी

आमची तन्वी गोरीगोरी पान
नवनवीन कपड्यात
दिसते छान।
तन्वी जवळ आहेत
बाहुली नि बाहुला
विमान, मोटर, गाड़ी
सारे तिला हवी
असतात खेळायला
रोज नवीन फ्रोक
तिला हवा असतो घालायला
आज पिंक तन्वी तर
उद्या ब्लू तन्वी
म्हणा म्हणते मला।
तन्वी चा असा
असतो थाट
बसायला हवा असतो तिला
आई बाबां च्या मांडी चा पाट
बाबांशी कधी
गट्टी फू करते
आईला ही बाबांशी
बोलू नको म्हणते
अशी ही तन्वी
अवखळ भारी
सर्वांची आवडती
घरी अन दारी।
आमची तन्वी
फार गोड
तिला खड़ी साखर
म्हणू की संत्र्या ची फोड़


सौ. विजया ब्राम्ह्णणकर ...... ०६_०९_92

No comments:

Post a Comment